मुंबई

साडे सात लाखांची लाच स्वीकारणाऱ्या कारिवली ग्रामपंचायत सरपंचाला अटक...

CD

साडेसात लाखांची लाच
स्वीकारताना सरपंचाला अटक

भिवंडी, ता. १० (वार्ताहर) ः ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कोटी ३३ लाख रुपये किमतीच्या कामाच्या निविदेत ग्रामपंचायत लोकसहभागातील १० टक्के रक्कम भरण्यासाठी, ठेकेदारास हमीपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडून साडेसात लाखांची लाच स्वीकारताना कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नाईक यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारिवली ग्रामपंचायत क्षेत्रातील तलाव संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून दोन कोटी ३३ लाख ४७ हजार ४१५ रुपये किमतीची निविदा एका ठेकेदारास मंजूर झाली होती. यामध्ये ९० टक्के रक्कम शासन देणार असून, १० टक्के निधी रक्कम लोकसहभागातून जमा करणे बंधनकारक होते. ग्रामपंचायत प्रशासनाने २३ लाख ३४ हजार ७४१ रुपयांपैकी सात लाख रुपये जिल्हा परिषदेकडे जमा केले, तर उर्वरित १६ लाख ३४ हजार ७४१ रुपये टप्प्याटप्प्याने जमा करण्यासाठी कारिवली ग्रामपंचायतीचेे जिल्ह परिषद अधिकारी यांनी सांगितले होते. त्यानुसार ठेकेदाराने ग्रामपंचायत सरपंच संजय नाईक यांची भेट घेऊन त्यांना हमीपत्र देण्याबाबत विनंती केली. त्या वेळी सरपंच संजय नाईक यांनी हमीपत्रासाठी १० लाखांची मागणी केली. तक्रारदाराने १० लाख रुपये दिल्यानंतरही जिल्हा परिषदेकडे त्यांनी हमीपत्र दिले नाही. त्यानंतर सरपंच संजय नाईक यांनी तक्रारदाराकडे ५ ऑक्टोबरला पुन्हा १० लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाने ७ ऑक्टोबरला सरपंचाच्या खासगी कार्यालयात पडताळणी कारवाई केली. त्या वेळी साडेसात लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी (ता. ९) सायंकाळच्या सुमारास ग्रामपंचायत परिसरातील सरपंच संजय नाईक यांच्या खासगी कार्यालयात तक्रारदारांकडून साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर पु्न्हा पेटलं! २४ तासांत ९ जणांची हत्या, १४ घरांना लावली आग; कांगपोकपी जिल्ह्यात बंदची हाक

High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Karmad Tomato Market : करमाडच्या टोमॅटो बाजारपेठेत रोज ५० लाखांची उलाढाल! चार महिने चालतो हंगाम; रोख पेमेंट, चांगला भाव अन् ५०० जणांना रोजगार

SCROLL FOR NEXT