मुंबई

ठाणे परिवहनमध्ये ५४१ महिला वाहकांची भरती होणार

CD

५४१ महिला वाहकांची
ठाणे परिवहनमध्ये भरती
प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे परिवहन सेवेच्या विस्तारीकरणासोबतच वाहकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने कंत्राटी भरतीची तयारी सुरू केली आहे. नव्याने दाखल होणाऱ्या ३९० ई-बस आणि सीएनजी बसच्या संचालनासाठी एकूण १,६४० वाहकांची आवश्यकता आहे. त्यापैकी ५४१ महिला वाहक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. या नियुक्तीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत ६४ कोटी १७ लाख ९२ हजार ६२८ रुपये खर्च होणार असून, त्यासंदर्भातील निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.
परिवहन सेवेच्या बस ताफ्यात नव्या ३९० बस दाखल झाल्यानंतर एकूण बसची संख्या ७९७ पर्यंत पोहोचणार आहे. वागळे आगारासाठी १०० सीएनजी, २० इलेक्ट्रिक डबलडेकर बस प्रस्तावित आहेत. तसेच कोलशेत, कळवा आणि छत्रपती शिवाजी महाराज आगारांत ई-बस दाखल करण्यात येणार आहेत. नव्या बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, चार्जिंग स्टेशनची उभारणी आणि चालकांची व्यवस्था संबंधित कंत्राटदारांकडून केली जाणार आहे. मात्र, वाहक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी परिवहन प्रशासनाची असणार आहे. सध्या दोन संस्थांमार्फत कंत्राटी वाहकांची सेवा घेतली जात आहे.
..............................
महिला आणि पुरुष वाहकांसाठी स्वतंत्र निविदा
वाहकांच्या आवश्यकतेनुसार, ३३ टक्के प्रमाणात ५४१ महिला वाहकांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. पुरुष वाहकांसाठीही स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नव्या बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होतील, त्यानुसार वाहक उपलब्ध करून घेतले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
.......................
एका वाहकामागे महिन्याला ३२ हजार ९५३ रुपये
किमान वेतन, महागाई, घरभाडे भत्ता, कंत्राटदाराचा प्रशासकीय खर्च आणि १८ टक्के जीएसटी यांचा समावेश केल्यानंतर एका वाहकामागे दरमहा अंदाजे ३२ हजार ९५३ रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार ५४१ महिला वाहकांसाठी वार्षिक सुमारे २१ कोटी ३९ लाख रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर पु्न्हा पेटलं! २४ तासांत ९ जणांची हत्या, १४ घरांना लावली आग; कांगपोकपी जिल्ह्यात बंदची हाक

High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Karmad Tomato Market : करमाडच्या टोमॅटो बाजारपेठेत रोज ५० लाखांची उलाढाल! चार महिने चालतो हंगाम; रोख पेमेंट, चांगला भाव अन् ५०० जणांना रोजगार

SCROLL FOR NEXT