मुंबई

महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू

CD

रुग्णवाहिकेअभावी जखमी महिलेचा मृत्यू

श्रीवर्धन, ता. १० (वार्ताहर) ः श्रीवर्धन येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. ९) मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रीवर्धनमधील आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिकांंनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन बाजारपेठेत शुक्रवारी (ता. ९) दुपारी चारच्या दरम्यान एका महिलेला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात महिला गंभीररीत्या जखमी झाली. या महिलेला उपचाराकरिता श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्काळ उपचार करीत त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, १०८ क्रमांकावर फोन करूनही रात्री साडेनऊ वाजता रुग्णवाहिका आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत महिलेची प्रकृती आणखी गंभीर झाल्याने रात्री दहाच्या सुमारास तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झाली नसून, प्रशासकीय दिरंगाईमुळे महिलेला प्राण गमवावे लागल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
--------------
अपघातग्रस्त एका अनोळखी महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील पथकाने तातडीने उपचार सुरू केले. मात्र, महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने सर्वतोपरी प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेला पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था होती. तथापि, प्रकृतीतील गंभीरतेमुळे त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
- डाॅ. कौस्तुभ केळस्कर, वैद्यकीय अधीक्षक,
उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT