मुंबई

मराठी भाषेची समृद्धी जपण्यासाठी संवादाची ''वारी''

CD

मराठी भाषेची समृद्धी जपण्यासाठी संवादाची ‘वारी’
नवी मुंबईत अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धेचा दिमाखदार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : संत ज्ञानेश्वर आणि जगद्‍गुरू तुकाराम महाराजांसारख्या प्रतिभावंतांच्या साहित्याने नटलेल्या मराठी भाषेचा वारसा जपणे आणि तिची समृद्धी वृद्धिंगत करणे ही प्रत्येकाची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी आहे. आजच्या आधुनिक जगात टिकण्यासाठी इंग्रजीचे महत्त्व असले, तरी आपल्या भावभावना, विचार आणि संस्कृतीचा गाभा जपण्यासाठी मराठी भाषा प्रत्येकाने घरातून व दैनंदिन व्यवहारातून नियमित वापरली पाहिजे, असा सूर पालिकेतर्फे आयोजित अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात उमटला.
नवी मुंबईकरांचा साहित्यिक उपक्रमांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, यापुढील वर्षीचे कार्यक्रम अधिक मोठ्या स्वरूपात शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केले जातील, अशी घोषणाही महापौरांनी याप्रसंगी केली. या सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव आणि स्पर्धेचे परीक्षक, सुप्रसिद्ध साहित्यिक व गझलकार विनोद पितळे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुनील पवार यांनी भाषा हे संवादाचे मुख्य माध्यम असल्याचे सांगत मराठीतूनच संवाद साधण्याचा आग्रह जपण्याबाबत आपले स्वानुभव मांडले. गझलकार विनोद पितळे यांनी पालिकेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. एकूण ७१ नागरिक व महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नावनोंदणी केली होती, यापैकी ४७ जणांनी प्रत्यक्ष व्यासपीठावर उपस्थित राहून उत्कृष्ट काव्य सादरीकरण केले. कडक चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेतून परीक्षक विनोद पितळे यांनी अंतिम निकाल जाहीर केला.

विजेत्यांची नावे
रुद्राक्ष पातारे यांना प्रथम क्रमांकाची तीन हजार रुपये मूल्याची ग्रंथभेट, दिलीप गायकवाड यांना द्वितीय क्रमांकाची २,५०० रुपये मूल्याची ग्रंथभेट, पल्लवी देशपांडे यांना तृतीय क्रमांक दोन हजार रुपये मूल्याची ग्रंथभेट, प्रणय चव्हाण, प्रज्ञा लळिंगकर, सोनाली नाईक, शीतल देशपांडे व सर्जेराव कुईगडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये मूल्याची ग्रंथभेट देण्यात आली. विशेष उल्लेखनीय सादरीकरण म्हणून प्रत्येकी ५०० रुपये मूल्याची ग्रंथभेट अनुजा खरसंबळे, अमोल वाघमारे व ॲड. निरंत पाटील यांना देण्यात आली.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT