मुंबई

दहा दिवसांत अमली पदार्थांचे ४२२ गुन्हे

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : अमली पदार्थांविरोधात ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर हत्याकांडानंतर शहरातील अमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर १ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांत विविध प्रकारचे एकूण ९४६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ४२२ गुन्हे अमली पदार्थविरोधी कलमांनुसार नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ठाणे शहर आणि वागळे या दोन परिमंडळांतच अमली पदार्थविरोधी २४३ गुन्ह्यांचा समावेश आहे.

ठाणे शहरात २४३ गुन्हे
ठाणे शहर आणि वागळे या दोन परिमंडळांत अमली पदार्थविरोधी कारवाईअंतर्गत १० दिवसांत २४३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी वागळे परिमंडळात १७४, तर ठाणे परिमंडळात ६९ गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन परिमंडळांतील कारवाई विशेष लक्षवेधी ठरली आहे.

वागळे इस्टेटमध्ये सर्वाधिक गुन्हे
१० दिवसांतील आकडेवारीनुसार, वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात सर्वाधिक ३५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याखालोखाल श्रीनगर येथे २९, वर्तकनगर आणि कोपरी येथे प्रत्येकी २५, नारपोली आणि चितळसर-मानपाडा येथे प्रत्येकी २३, तर कासारवडवली येथे २२ गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणेनगरमध्ये २१, राबोडीमध्ये २० आणि अंबरनाथमध्ये १८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विठ्ठलवाडी आणि शांतीनगर येथे प्रत्येकी १७, कापूरबावडी येथे १५, मुंब्रा येथे १३, तर महात्मा फुले चौक, नौपाडा आणि हिललाइन येथे प्रत्येकी १० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मध्यवर्ती आणि खडकपाडा येथे प्रत्येकी नऊ, बाजारपेठ आणि निजामपुरा येथे प्रत्येकी आठ, तर उल्हासनगरमध्ये सात गुन्हे दाखल झाले आहेत. बदलापूर येथे सहा, बदलापूर पश्चिम आणि भिवंडी शहर येथे प्रत्येकी पाच, कळवा आणि कोनगाव येथे प्रत्येकी चार, शिवाजीनगर आणि मानपाडा येथे प्रत्येकी तीन, तर डायघर आणि डोंबिवली येथे प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. विष्णुनगर, एमएसईबी आणि सायबर पोलीस ठाण्यांत या वर्गवारीत गुन्हे दाखल झालेले नाहीत.

ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद
यंदा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या १० दिवसांतील एकूण गुन्ह्यांची आकडेवारी पाहता, ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक ९४६ गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारीत याच कालावधीत ७९०, फेब्रुवारीत ५०४, मार्चमध्ये ४७५, एप्रिलमध्ये ६३९, मेमध्ये ५८०, जूनमध्ये ८४४, जुलैमध्ये ६२०, ऑगस्टमध्ये ६५९ आणि सप्टेंबरमध्ये ६७२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. ऑक्टोबरमधील वाढलेली संख्या पोलिसांच्या विशेष मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरत आहे.

ठाणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत इतर गुन्ह्यांप्रमाणेच अमली पदार्थांविरोधातही कारवाई सुरू आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाया करून गुन्हे दाखल केले जात आहेत.
- आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT