वन परिक्षेत्रात ‘वन्यजीव सप्ताह’ उत्साहात
विविध स्पर्धांद्वारे वन्यजीव संरक्षणाचा संदेश
कासा, ता. ११ (बातमीदार) : निसर्गाचा समतोल राखण्यासह वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनमानसात, विशेषतः लहान मुलांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने कासा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महालक्ष्मी (विवळवेढे) आणि बापूगाव येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही शाळांमधील या कार्यक्रमांचे रीतसर उद्घाटन कासा वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी (म.व.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आठवडाभर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाते जोडत आपला सहभाग नोंदवला. निबंधलेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षण आणि निसर्गाचे महत्त्व यांविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले, तर चित्रकला स्पर्धेत आपल्या कल्पकतेच्या जोरावर वनसंवर्धनाचा संदेश देणारी सुंदर चित्रे रेखाटली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचे आवाहन
‘‘मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गाची अन्नसाखळी आणि समतोल टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीवांचे अस्तित्व महत्त्वाचे असून, वनसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे.’’
- सुरेश गवारी (वन परिक्षेत्र अधिकारी, कासा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.