मुंबई

ठाणे स्थानकावर गर्दीचा ताण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : देशातील पहिली रेल्वे धावलेल्या ठाणे स्थानकाने आता देशातील सर्वाधिक प्रवासी वर्दळीच्या स्थानकांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या रेल्वे आकडेवारीनुसार, वर्षभरात तब्बल नऊ कोटी ३० लाख प्रवाशांची ये-जा या स्थानकातून झाली. म्हणजेच दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी ठाणे स्थानकाचा वापर करतात. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे स्थानकावरील गर्दीचा ताण तीव्र होत असताना ही गर्दी विभागणारे नवीन स्थानक, अतिरिक्त रेल्वे मार्गिका आणि पर्यायी जोडमार्गांचे प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेत स्थानकात पोहोचण्यापासून लोकलमध्ये चढणे आणि इच्छित स्थळी उतरण्यापर्यंत प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

मुंबईच्या उपनगरी रेल्वेवरील प्रवाशांचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे स्थानकापाठोपाठ कल्याणचा क्रमांक लागतो. येथे याच कालावधीत आठ कोटी ३७ लाख ९२ हजार ६६७ प्रवासी फुटफॉल नोंदविण्यात आला. ठाणे शहरात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमधून उतरणारे आणि चढणारे प्रवासी यांची एकाच वेळी होणारी गर्दी, फलाटांवरील मर्यादित जागा, पादचारी पुलांवरील कोंडी आणि स्थानकाबाहेरील वाहतूक यामुळे प्रवाशांची कोंडी होते. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढताना आणि उतरताना होणारी धक्काबुक्की, गर्दीमुळे होणारे अपघात आणि मृत्यूचा घटना चिंता वाढवत आहेत.

ठाणे स्थानकाची गर्दी वाढत असली तरीही वाढत्या भाराच्या तुलनेत रेल्वेची पायाभूत क्षमता वाढविणारे प्रकल्प अपेक्षित वेगाने पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानकाचा पुनर्विकास करण्याबरोबरच संपूर्ण उपनगरी रेल्वे जाळ्याची क्षमता वाढविण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे. गर्दीच्या वेळी स्थानकात पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे फलाट क्रमांक दोनवरील कॅन्टीन बंद करून ती जागा मोकळी करण्याची मागणी उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

नवीन स्थानकाची प्रतीक्षा
ठाणे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान प्रस्तावित नवीन स्थानक महत्त्वाचे मानले जाते. घोडबंदर रोड, पोखरण रोड आणि वागळे इस्टेट परिसरातील प्रवाशांना या स्थानकाचा पर्याय उपलब्ध झाल्यास ठाणे स्थानकावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग मिळण्याची प्रतीक्षा आहे. रेल्वे प्रशासन आणि ठाणे महापालिका यांच्यात समन्वयाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला असून, प्रतीक्षा लांबली आहे.

अतिरिक्त मार्गिकांच्या कामांना गती कधी?
मुंबईच्या उपनगरी रेल्वेवरील गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारणे आवश्यक आहे. कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका, कल्याण-कसारा तसेच कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याची गती मंदावली आहे. सध्या उपनगरी लोकलसह मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक एकाच रेल्वे जाळ्यावरून होत असल्याने मार्गिकांवर ताण येत आहे. अतिरिक्त मार्गिका उपलब्ध झाल्यास उपनगरी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक परिणामकारकपणे हाताळता येऊ शकते. गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्यांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठीही या मार्गिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

कल्याण स्थानक रिमॉडेलिंग संथ
कल्याणपलीकडील परिसरात लोकसंख्या आणि प्रवासीसंख्या वाढत असताना स्थानकाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. कल्याण येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणीही प्रवासी संस्थेने केली आहे.

कळवा-ऐरोली मार्गाचा विलंब
कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गामुळे ठाणे परिसरातील प्रवाशांना नवी मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी रेल्वे जोडणी उपलब्ध होणार आहे. ऐरोली, घणसोली आणि नवी मुंबईतील औद्योगिक तसेच निवासी भागांकडे जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गाचा फायदा होऊ शकतो. या जोडमार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचा मुद्दा प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे स्थानकावरील गर्दी किती कमी होईल, याचे अधिकृत मूल्यमापन करण्याबरोबरच काम पूर्ण होण्याची निश्चित मुदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.

लोकलच्या फेऱ्या, डब्यांची क्षमता
अतिरिक्त मार्गिका आणि नवीन स्थानकांच्या कामांबरोबरच लोकल गाड्यांची प्रवासी क्षमता वाढविण्याची गरज आहे. गर्दीच्या वेळेत लोकलच्या अधिक फेऱ्या सुरू करणे, १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आणि वेळापत्रकाचे पुनर्नियोजन करणे आवश्यक आहे. १५ डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी फलाटांची लांबी, सिग्नल व्यवस्था आणि अन्य तांत्रिक सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्या लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT