मुंबई

रिंग मेट्रोविरोधात चिपको आंदोलन

CD

रिंग मेट्रोविरोधात
चिपको आंदोलन
वृक्षतोड रोखण्यासाठी वाघबीळमध्ये रहिवासी रस्त्यावर


सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : रिंग मेट्रो प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी घोडबंदर मार्गावरील वाघबीळ येथे रविवारी (ता. ११) नागरिकांनी झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केले. हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले. हजारो झाडांचा बळी देणाऱ्या प्रकल्पाला विरोध करीत नागरिकांनी रिंग मेट्रो रद्द करण्याची मागणी या वेळी केली.
वाघबीळ परिसरातील वृक्षतोडीमुळे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्यात आधीच वाहतूक कोंडी आणि हरित क्षेत्रांमध्ये घट अशा समस्या असताना मेट्रोसाठी झाडांची कत्तल का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. ‘ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो’ या नागरिक मंचच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन करण्याचा इशारा मंचने यापूर्वीच दिला होता. त्यानुसार रविवारी नागरिकांनी झाडांना मिठी मारून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. आधीच तोडण्यात आलेल्या झाडांबद्दल आणि तोडीच्या धोक्यात असलेल्या वृक्षांबद्दल चिंता व्यक्त करीत नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी एकजूट दाखवली.

दररविवारी आंदोलन
अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाला विविध भागांतून विरोध होत आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून दररविवारी रहिवासी आंदोलन करीत आहेत. पोखरण रस्ता क्रमांक दोन परिसरात मानवी साखळी करून नागरिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. बॅरिस्टर नाथ पै मार्गावरील रहिवाशांनी मूक मोर्चा काढून मार्ग बदलण्याची मागणी केली. हिरानंदानी इस्टेट परिसरातही मानवी साखळीच्या माध्यमातून रहिवाशांनी आपली भूमिका मांडली होती. आता वाघबीळमध्ये वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन झाल्याने या विरोधाला पर्यावरणाच्या मुद्द्याची जोड मिळाली आहे.

पर्यायी वाहतूक व्यवस्थेची मागणी
रिंग मेट्रोविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ॲड. राधिका राणे यांनी वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त केली. वाघबीळमध्ये सुरू झालेली वृक्षतोड हा प्रस्तावित प्रकल्पाचा चिंताजनक परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो झाडांचा बळी न देता ठाण्यासाठी अधिक चांगल्या आणि शाश्वत वाहतूक पर्यायांचा विचार करावा. त्यामुळे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, वयाच्या ८०व्या वर्षी टेंभी नाका परिसरातून वाघबीळ येथे आंदोलनात सहभागी झालेले आनंद चौबल यांनीही वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक ठाणेकराची असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT