मुंबई

ढोल-ताशांच्या गजरात श्यामनगरच्या नवदुर्गेचे आगमन

CD

ढोल-ताशांच्या गजरात शामनगरच्या नवदुर्गेचे आगमन
गंगा आरती, धूप आरती, महिलांच्या नृत्याविष्काराने सोहळ्याला रंगत
जोगेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः ढोल-ताशांचा गजर, देवीचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात जागृत सेवा संघ, श्री साई नवरात्रोत्सव मंडळाच्या श्यामनगरच्या नवदुर्गेचे शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी ७ वाजता आगमन झाले. मंडळाचे यंदा ४९वे वर्ष असून, पारंपरिक आगमन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या वेळी मालपा डोंगरी येथील ओंकार बिट्सच्या वतीने देवीला मानवंदना देण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादाने आणि जयघोषाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गंगा आरती आणि धूप आरती हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. धूप आरतीमध्ये पाच वर्षांच्या बालिकांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘लल्लाटी भंडार’ या भक्तिगीतावरील लहान मुलींच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ‘उदो उदो’ या गीतावरील नृत्याने सोहळ्यात आणखी रंगत आणली. स्थानिक महिलांच्या नृत्याविष्कारातून भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडले.
मूर्तिकार सर्वेश सावंत यांनी साकारलेली नवदुर्गेची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी आगमन सोहळ्याची माहिती दिली. गेल्या ४९ वर्षांपासून जपली जाणारी परंपरा यंदाही भक्तिभावाने पुढे नेण्यात आली. धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT