मुंबई

पाणी देयक वसुलीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : महापालिकेच्या पाणीदेयक वसुलीच्या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुन्याच कंत्राटदाराची मदत घेतली जाणार आहे. अतिरिक्त कनिष्ठ अभियंते आणि कर्मचारी बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीकरिता ९९ लाख २९ हजारांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून या खर्चाला मान्यता घेण्याची प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या पटलावर ठेवला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पाणीदेयकांची वसुली करण्यासाठी एका संस्थेला काम देण्यात आले होते. मात्र, या कामाची मुदत जुलैअखेर संपुष्टात आली आहे. पुढील कालावधीसाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला असला, तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यातच निविदा प्रक्रिया पूर्ण करून नव्या कंत्राटदाराला कार्यादेश देण्यासाठी आणखी दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे. पाणीबिलांची वसुली हे महापालिकेच्या उत्पन्नाशी संबंधित महत्त्वाचे काम असल्याने या कालावधीत मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाल्यास वसुलीवर परिणाम होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यमान कंत्राटदाराकडूनच मंजूर निविदा दरानुसार काम करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या कामासाठी होणारा खर्च ‘जलकुंभ परिचलन (कर्मचारी खर्चासह)’ या लेखाशीर्षाखाली करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT