सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : दिवा परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. या तीनही प्रभागांतील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी करणारे निवेदन अर्चना पाटील यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना दिले.
दिव्यातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा भागवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावेत, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करण्याची आवश्यकता निवेदनातून अधोरेखित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ मधील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, टंचाईची कारणे, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्थेतील अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक बाबाजी पाटील, शैलेश पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, दीपाली भगत, साक्षी मढवी आणि स्नेहा पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.