मुंबई

महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना

CD

महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका
पनवेलमधील सिग्नल यंत्रणा बंद करून वीज वाचविण्याचा प्रयत्न
नवीन पनवेल, ता. १० (बातमीदार) : शहरासह परिसरातील प्रमुख चौकांमधील सिग्नल यंत्रणा अचानक कोलमडल्याने ऑक्टोबरच्या रणरणत्या उन्हात नागरिकांना भीषण कोंडीचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला महापालिकेने वीजबिल भरले नसल्याची चर्चा पसरली होती; मात्र पालिकेने तत्काळ स्पष्टीकरण देत महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचे उघड केले आहे.
संपूर्ण पनवेल शहरातील नवीन पनवेल एचडीएफसी सर्कल, विजय सेल्स सिग्नल, तक्का येथील शिवशंभो नाका, कामोठेमधील सेक्टर १९ आणि मुख्य म्हणजे कळंबोली सर्कलवरील सिग्नलचादेखील वीजपुरवठा खंडित केला होता. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

कोणतेही बिल थकीत नाही!
१ याबाबत वाहतूक विभागाने माहिती मिळविण्यासाठी महावितरणजवळ संपर्क साधला असता, पालिकेने विजबिल न भरल्याचे कारण देण्यात आले, मात्र ही बाब पालिकेच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी महावितरणशी संपर्क साधल्यानंतर वेगळेच कारण समोर आले आहे. या वेळी पालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख किरण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्रकार म्हणजे महावितरणकडून दुष्काळाच्या अनुषंगाने घेतलेला शटडाऊन असल्याचे त्यांनी सांगितले.
२ तसेच पालिकेने सदर विजबिल न भरल्याबाबतची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पालिकेकडून कोणत्याही प्रकारचे बिल थकीत ठेवले नाही. तसेच, शुक्रवारी पालिकेला कोणत्याही प्रकारचे संदेश किंवा पत्र न देता अचानक शटडाऊन घेतल्याने घडला असल्याचे किरण जाधव यांनी सांगितले. या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT