मुंबई

कांदिवलीत दांडीयातून व्यसनमुक्त भारताचा संदेश

CD

कांदिवलीत दांडीयातून व्यसनमुक्त भारताचा संदेश
जोगेश्‍वरी, ता. ११ (बातमीदार) ः कांदिवली (पूर्व) त नवरात्रोत्सवातील भक्ती, संस्कृती आणि देशप्रेमाचा संगम साधणाऱ्या ‘रंगीला गरबा’ महोत्सवाचे आयोजन भाजपचे मुंबई महासचिव तथा साई प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष विनोद शेलार यांच्या पुढाकाराने गोरसवाडी मैदानात करण्यात आले आहे. २० ऑक्टोबरपर्यंत चालणारा हा महोत्सव गरबाप्रेमींसाठी विनामूल्य खुला आहे. यंदाच्या महोत्सवात गरबा आणि दांडियासोबतच सामाजिक जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवून व्यसनमुक्त भारताचा संदेश देण्यासाठी मैदानात विविध जनजागृतीपर घोषवाक्ये लावण्यात आली आहेत. ‘ड्रग्जमुक्त भारत’ या संकल्पनेतून तरुणांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त महोत्सवाला विशेष देशभक्तिपर स्वरूप देण्यात आले आहे. दररोज गरब्याची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाने होणार असून, त्यातून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा उद्देश आहे.गरबाप्रेमींसाठी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवरही भर देण्यात आला आहे. पारंपरिक नवरात्रोत्सवाला सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रभक्तीची जोड देणारा हा उपक्रम ठरत आहे. भक्ती, संस्कृती आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या महोत्सवाला नागरिक आणि तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT