मुंबई

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार प्रत्येकी ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान !

CD

कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान
नवी मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभागृह नेते सागर नाईक यांचा प्रस्ताव
​वाशी, ता. ११ (बातमीदार) ः पालिकेच्या ऑक्टोबर महिन्याच्या आगामी सर्वसाधारण सभेत सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विविध योजनांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा प्रस्ताव सादर केला आहे. सभागृह नेते सागर नाईक यांच्या प्रस्तावानुसार २०२६ च्या दिवाळीनिमित्त महापालिकेच्या सर्व संबंधित घटकांना सरसकट ४५ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) देण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावावर आगामी सभेत काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
​यापूर्वी पालिकेतील वेगवेगळ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पद किंवा श्रेणीनुसार वेगवेगळ्या दराने सानुग्रह अनुदान दिले जात होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक तफावत आणि विषमता निर्माण होत असे. ही तफावत दूर करून पालिकेच्या नागरी सेवा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि प्रशासकीय कामकाज सांभाळणाऱ्या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळावा, या उद्देशाने हा सरसकट सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मांडला आहे. ​

४,९६१ लाभार्थ्यांना मिळणार फायदा
प्रस्तावानुसार महापालिकेच्या विविध विभागांतील तब्बल चार हजार ९६१ लाभार्थ्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. प्रत्येकी ४५, हजारांच्या या दरामुळे महापालिकेच्या तिजोरीवर एकूण २२ कोटी ३२ लाख ४५ हजार इतका आर्थिक भार पडणार आहे. हा खर्च २०२६-२७ च्या संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवला जाणार आहे. ​सभागृह नेते सागर नाईक यांच्या या प्रस्तावामुळे महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT