बनावट व्हॉट्सॲप डीपीद्वारे
कंपनीला १० लाखांचा गंडा
अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : कंपनीच्या मालकाच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप खाते तयार करून तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अंबरनाथ एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेतील कानसई गाव परिसरातील एमआयडीसीमध्ये ओकोबिलाज बायोकेन या कंपनीचे मालक व संचालक अजयकुमार पिल्लई यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून सायबर भामट्याने बनावट व्हॉट्सॲप खाते तयार केले. या खात्याच्या माध्यमातून कंपनीशी संपर्क साधून स्वतः अजयकुमार पिल्लई हेच संदेश पाठवत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यानंतर या बनावट खात्यावरून कंपनीला संदेश पाठवून बंधन बँकेतील एका खात्यावर तातडीने १० लाख रुपये हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले. संदेशावर विश्वास ठेवून कंपनीकडून ही रक्कम पाठविण्यात आली. मात्र, हा प्रकार बनावट खात्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी सचिन रघुनाथ पाटील (वय ४२) यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.