सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी सचिन गावकर यांनी ‘भावजागर - मना’ची आनंदयात्रा’ या सायकल मोहिमेला १० ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून आठ हजार किलोमीटरचा प्रवास करत नागरिकांशी संवाद साधणे, मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करणे आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मोकळे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही यात्रा १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
गावकर यांनी २०१५ मध्ये सायकलवरून भारत परिक्रमा केली होती. या प्रवासात विविध भागांतील नागरिकांशी संवाद साधताना त्यांना देशाची सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक विविधता अनुभवता आली. याच अनुभवातून ‘भावजागर’ मोहिमेची संकल्पना साकारली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांचे अनुभव समजून घेत मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जाणार आहे. ही मोहीम ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आली आहे. डॉ. नाडकर्णी यांना अखेरचा निरोप देण्यात आलेल्या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी माध्यमाच्या शाळेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून यात्रेची सुरुवात व सांगता करण्याचा गावकर यांचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.