मुंबई

नाव्हा शेवा रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांची होत आहे गैरसोय

CD

न्हावा-शेवा रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकी, प्रवाशांची गैरसोय
उरण, ता. १२ (वार्ताहर) ः सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी उरण-नेरूळ/बेलापूर रेल्वे मार्गावरील न्हावा-शेवा रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला तिकीट खिडकी उपलब्ध नसल्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानकाच्या पूर्व परिसरातील नागरिकांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी संपूर्ण स्थानकाचा फेरा मारून पश्चिम बाजूला जावे लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेरूळ-उरण मार्गावरील लोकल सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या प्रवासात मोठी सुलभता आली आहे; परंतु नियोजनातील त्रुटींमुळे प्रवाशांच्या समस्या अजूनही संपलेल्या नाहीत. न्हावा-शेवा रेल्वे स्थानकाला पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही बाजूंना परिसर जोडला गेला आहे, मात्र तिकीट खिडकी केवळ पश्चिम बाजूलाच उपलब्ध करून दिली आहे. परिणामी, पूर्व भागातून येणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट किंवा पास काढण्यासाठी किंवा प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी रेल्वे रुळांवर असलेल्या पादचारी पुलावरून वळसा घालून पश्चिम बाजूला जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना या अंतरामुळे मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

न्हावा-शेवा रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला रहिवासी वसाहती मोठ्या प्रमाणावर आहेत. येथून शेकडो प्रवासी रोज मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने प्रवास करतात, मात्र पूर्व बाजूला तिकीट खिडकी नसल्यामुळे आम्हाला साधे तिकीट काढण्यासाठी स्थानकाला पूर्ण वळसा घालून पश्चिम बाजूला जावे लागते. प्रशासनाने तातडीने पूर्व बाजूला तिकीट खिडकी किंवा ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन सुरू करावी.
- विकास पाटील, स्थानिक प्रवासी

सकाळच्या वेळी ऑफिसला जाताना वेळेची खूप घाई असते. स्थानकावर आल्यावर लक्षात येते की तिकीट काढायला पुन्हा पश्चिम बाजूला जावे लागेल, तेव्हा धावपळ उडते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची ही साधी पण महत्त्वाची अडचण लवकरात लवकर सोडवावी.
- प्रियांका म्हात्रे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT