मुंबई

मुरबाड-वाशिंद मार्ग खड्ड्यांत

CD

मुरबाड, ता. १२ (बातमीदार) : मुरबाड आणि शहापूर तालुक्यांना जोडणारा; तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या मुरबाड-शिरगाव-शेई-शेरे-वाशिंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह परिसरातील शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील आठवड्यात या मार्गावरील अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याने रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील अनेक नागरिक दररोज कामानिमित्त, खरेदीसाठी; तसेच वाशिंद रेल्वेस्थानक आणि पडघा येथील गोदाम परिसरात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी यापूर्वी परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मुरबाडच्या तहसीलदारांनी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. शिरगाव, मोहरई, झापवाडी, पवाले, शिदगाव, टेमगाव, चिखले आणि परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

प्रशासनाला जाग येणार कधी?
मागील आठवड्यात ब्राह्मणगाव येथील एक दाम्पत्य कार्यक्रमासाठी दुचाकीवरून शिरगाव येथे जात असताना खराब रस्त्यामुळे अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखाद्या दुचाकीस्वाराचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवघटी विराजमान, ब्रिटिशांपासून पोलिस मानवंदनेची परंपरा

बापरे! इतक्या कोटींची आहे ध्रुव राठीची संपत्ती? पत्नी, शिक्षण आणि करिअरबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT