पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका तरी कधी ?
नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
नवीन पनवेल, ता. १२ (बातमीदार) : ऐन सणासुदीच्या काळात पनवेल शहरातील रस्त्यांवर निर्माण होणाऱ्या भीषण कोंडीमुळे पनवेलकर हैराण झाले आहेत. त्यातच काही बेशिस्त वाहनचालक नियम धाब्यावर बसवून थेट विरुद्ध दिशेने (राँग साइडने) वाहने चालवत असल्यामुळे कोंडीत अधिक भर पडत आहे.
सण-उत्सवाच्या काळात तालुक्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी पनवेल शहरात येतात. त्यामुळे येथे मोठी गर्दी होती. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी हे सण म्हणजे पनवेल शहरातील नागरिकांसाठी कोंडीचे दिवस ठरतात. महापालिकेकडूनही या काळात अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई केली जात असली तरीही या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळाविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होताना दिसत आहे. काही ठिकाणी रस्ते बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बॅरिगेड लावले होते. परंतु, तिथे कोणीही पोलीस कर्मचारी नसल्यामुळे ते बाजूला करून चालक वाहन पुढे नेत असल्याचे चित्र दिसून येत होते.
प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा बोजवारा
शहरातील शिवाजी महाराज चौक, कर्नाळा सर्कल, जयभारत नाका, टपाल नाका, पंचरत्न चौक, आदर्श चौक, शिवाजी रोड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कोहिनूर नाका या ठिकाणी सोमवारी (ता. १२) कोंडी झालेली पहायला मिळाली.
या कोंडीतही शिवाजी चौकात केवळ दोन पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पनवेल शहरातील इतर कोणत्याच ठिकाणी पोलिस नसल्यामुळे वाहनचालक स्वत: रस्त्यावर उतरून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सणासुदीला नागरिकांचे शहरात येण्याचे प्रमाण अधिक असते. पनवेल पालिका क्षेत्रासह काही ग्रामीण भाग, मुंबई-पुणे मार्ग आदी ठिकाणी कर्मचारी तैनात केलेले असतात. मात्र, अचानक झालेल्या वाहतूक कोंडीचा त्रास सोडविण्यासाठी तात्काळ कर्मचाऱ्यांची अधिक यंत्रणा उपलब्ध करून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
- सुभाष पुजारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.