जोगेश्वरी, गोरेगावमध्ये जलद लोकलला थांबा द्या!
मालाड, ता. १२ (बातमीदार) : चर्चगेटहून सुटणाऱ्या दोन जलद मालाड लोकल गाड्यांना जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांवर पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवासी व वाहतूक मदत संघटनेचे सचिव मन्सूर उमेर दरवेश यांनी पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.
चर्चगेटहून रात्री ९.०५ आणि ९.४३ वाजता सुटणाऱ्या या दोन्ही मालाड जलद लोकल गाड्यांना यापूर्वी अंधेरीनंतर जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांवर थांबा देण्यात येत होता. मात्र, १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकात या दोन्ही स्थानकांवरील थांबे बंद करण्यात आले आहेत. यामुळे जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन जलद लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकांवरील थांब्याचा लाभ मिळत होता. थांबे बंद झाल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत असून, वेळ आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांवर थांबा देऊन जुने वेळापत्रक लागू करावे, अशी मागणी दरवेश यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.