मुंबई

न्यायासाठी धावणारी संवेदनशील वकील

CD

न्यायासाठी धावणारी संवेदनशील वकील
प्रसिद्धीपासून दूर राहून पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न; वंचितांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा

घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) : समाजात अनेक जण आपल्या कर्तृत्वाने ओळख निर्माण करतात; मात्र काही व्यक्ती अशा असतात की त्या प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून आपल्या कार्यातून असंख्य लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करतात. अन्यायाने ग्रासलेल्या माणसाला न्याय मिळवून देणे, संकटात सापडलेल्या महिलेला धीर देणे, घर गमावण्याची भीती असलेल्या कुटुंबाला आधार देणे आणि उपेक्षित समाजघटकांच्या हक्कांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून लढा देणे, हेच ज्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मानले आहे, अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे ॲड. फाल्गुनी ब्रह्मभट्ट.
वयाच्या ५२व्या वर्षीही समाजासाठी सातत्याने धडपडणाऱ्या फाल्गुनी ब्रह्मभट्ट गेली २५ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत आहेत. लंडन येथून बीए आणि एलएलएमचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचा अनुभव मिळवला. कायद्याचा सखोल अभ्यास, न्यायव्यवस्थेची जाण आणि सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो.
अंधेरी येथे वास्तव्यास असलेल्या फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांचे घाटकोपर आणि विक्रोळी परिसरातही समाजकार्य सुरू असते. त्यांच्या कार्याचा परीघ केवळ एका विभागापुरता मर्यादित नाही. समाजातील विविध घटकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांमध्ये त्या शक्य तेथे पुढाकार घेतात. त्यांच्या दृष्टीने माणसाची जात, धर्म, आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक स्थान यापेक्षा त्याला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. फाल्गुनी ब्रह्मभट्ट या महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन संबंधित महिलांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतात. तक्रार नोंदवण्यापासून ते पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यापर्यंत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचा हात देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात अनेकदा कायदेशीर प्रश्नांना सामोरे जावे लागते. मालमत्तेचे वाद, हक्कांबाबतची अनिश्चितता किंवा इतर कायदेशीर अडचणी यांमुळे त्यांची मानसिक घालमेल होते. अशा वेळी अनेक ज्येष्ठ नागरिक फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांना संपर्क साधतात. विशेष म्हणजे काही ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी बाहेर पडणे शक्य नसल्यास त्या स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांची समस्या समजून घेतात आणि आवश्यक कायदेशीर मदत करण्याचा प्रयत्न करतात.

किन्नर समाजाच्या हक्कांसाठी ठाम लढा
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दूर ठेवला जाणारा किन्नर समाज आजही विविध प्रकारच्या भेदभावाला आणि अन्यायाला सामोरा जातो. अशा वेळी या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम फाल्गुनी ब्रह्मभट्ट करीत आहेत. किन्नर माँ ट्रस्टच्या माध्यमातून किन्नर समाजातील व्यक्तींना महाराष्ट्रात कुठेही त्रास झाल्यास त्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी त्या पुढाकार घेतात.

तीन हजार महिलांना स्वावलंबनाची दिशा
महिलांना सक्षम बनवायचे असेल, तर त्यांना केवळ सहानुभूती देऊन चालत नाही तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधीही उपलब्ध करून द्यावी लागते. हाच विचार प्रत्यक्षात उतरवताना फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी मिका सिंह यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे तीन हजार महिलांना शिवणकाम आणि ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रशिक्षणामुळे महिलांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी मिळवण्याची आणि आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची दिशा मिळाली.

एकता मंचच्या माध्यमातून मोफत कायदेशीर मदत
न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावण्याची वेळ अनेकांवर येते; परंतु वकिलांचे शुल्क, कायदेशीर प्रक्रियेची गुंतागुंत आणि आर्थिक अडचणी यांमुळे अनेक जण आपला लढा सुरू करण्यापूर्वीच हतबल होतात. अशा नागरिकांसाठी एकता मंचच्या माध्यमातून मोफत कायदेशीर सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम फाल्गुनी ब्रह्मभट्ट करतात.

बंजारा बस्ती, मोहननगरमधील कुटुंबांसाठी न्यायालयीन लढा
घाटकोपरमधील बंजारा बस्ती आणि मोहननगर परिसरातील झोपड्या रेल्वे प्रशासनाकडून हटवण्याची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा तेथील रहिवाशांसमोर आपल्या घरांचे काय होणार, असा गंभीर प्रश्न उभा राहिला. या रहिवाशांना पर्यायी हक्काचे घर मिळेपर्यंत त्यांना तेथून हटवू नये, या मागणीसाठी फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी उच्च न्यायालयात कायदेशीर लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती मिळवण्यात यश आले आणि अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT