मुंबई

बनावट पालिका अधिकाऱ्याला अटक

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : देवीच्या यात्रेत कपड्यांचे दुकान लावायचे असेल तर दररोज ५०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करीत ठाणे महापालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या तरुणाला विक्रेत्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जांभळी नाका परिसरात रविवारी (ता. ११) रात्री हा प्रकार घडला. योगेश राकेश गुप्ता (वय २१) असे त्याचे नाव असून, त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुनीता चिम्बलिया या वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या महिला कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. दरवर्षीप्रमाणे त्यांनी देवीच्या यात्रेनिमित्त जांभळी नाका येथील पतंजली दुकानासमोरील रस्त्यावर कपड्यांचे दुकान लावले होते. रात्रीच्या वेळी पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला एक तरुण त्यांच्याजवळ आला. रस्त्यावर दुकान का लावले, परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा करीत त्याने विक्रेत्या महिलांना दमदाटी केली. आपण ठाणे महापालिकेचे अधिकारी असल्याचे सांगत कारवाईची धमकीही दिली. त्यानंतर त्याने गळ्यातील निळ्या-पांढऱ्या रंगाची महाराष्ट्र शासन असे लिहिलेली पट्टी दाखवली. यात्रेच्या कालावधीत दुकान लावायचे असेल तर दररोज ५०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. तसेच परिसरातील माया गौरसवा आणि राधा साथलिया या दोन महिलांच्या कपड्यांनाही लाथ मारून ते रस्त्यावर फेकल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडेही प्रत्येकी ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीकडे मदत मागितली. त्याने इतरांच्या मदतीने संबंधित तरुणाला पकडून ठाणेनगर पोलिस ठाण्यात नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT