मुंबई

मसाजवेळी वृद्धेला झोप लागताच दागिने गायब

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : मसाज करताना वृद्धेला झोप लागल्याची संधी साधून तिच्या घरातून सोन्याची अंगठी आणि सोन्याची चेन, असे एकूण एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना ठाण्यातील कॅसल मिल नाका परिसरात घडली. याप्रकरणी मसाजसाठी आलेल्या महिलेवर चोरीचा संशय घेण्यात आला असून, वृद्धेने राबोडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ६२ वर्षीय महिला कॅसल मिल नाका परिसरातील सुमेर कॅसल इमारतीत कुटुंबासह राहते. त्यांनी ५ ऑक्टोबरला ॲपवरून मसाज सेवा बुक केली होती. त्यानुसार सायंकाळी महिला त्यांच्या घरी आली. त्या वेळी तक्रारदार महिला आणि त्यांचे पती घरातील वेगवेगळ्या बेडरूममध्ये होते. मसाज सुरू करण्यापूर्वी तक्रारदार महिलेच्या डाव्या हाताच्या बोटांत सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या. मसाज सुरू असताना त्यांना झोप लागली. त्यानंतर मसाज करणारी महिला कोणतीही कल्पना न देता घरातून निघून गेली. त्यानंतर सुमारे तासाभराने तक्रारदार महिलेच्या लक्षात आले, की त्यांच्या बोटातील सात ग्रॅमची सोन्याची अंगठी गायब आहे. त्यांनी बेडरूममध्ये शोध घेतला असता अंगठी मिळाली नाही. त्याच खोलीतील कपाटात ठेवलेली मुलीची साडेसहा ग्रॅमची सोन्याची चेनही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी घरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर मसाजसाठी आलेल्या महिलेकडे विचारणा केली. मात्र, तिने दागिने घेतले नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT