मुंबई

नवी मुंबईसाठी ३० वर्षांचा जलसुरक्षा आराखडा तयार करा!

CD

जलसुरक्षेसाठी ३० वर्षांचे नियोजन करा
सजग नागरिक मंचची महापौरांकडे मागणी
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईतील वाढता पुनर्विकास, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. पुढील २० ते ३० वर्षांचा जलसुरक्षा आराखडा तयार करून १२ प्रमुख उपाययोजनांचा कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचने महापौर सुजाता सूरज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या आर्टिस्ट व्हिलेज धरणाची तांत्रिक व्यवहार्यता तपासावी. तसेच बेलापूर, खारघर हिल आणि फणसवाडी परिसरात लहान धरणे व जलसाठे उभारण्याची शक्यता पडताळून पाहावी. पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मंचने केली आहे.

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखा
मोरबे धरणातून पुरविण्यात येणाऱ्या शुद्ध पाण्याचा वापर गाड्या धुणे, पार्किंग स्वच्छ करणे आणि उद्यानांतील गवताला पाणी देण्यासाठी होऊ नये. यासाठी कडक नियंत्रण ठेवून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढविण्यासाठी ‘ड्युअल प्लम्बिंग’ व्यवस्था बंधनकारक करावी, असेही मंचने सुचविले आहे.

जल लेखापरीक्षणाचा अहवाल सार्वजनिक करा
मोरबे धरणातून उचलले जाणारे पाणी, शुद्धीकरण, वितरणातील गळती, अनधिकृत जोडण्या आणि बिलिंग यांची स्वतंत्र संस्थेमार्फत तपासणी करावी. या जल लेखापरीक्षणाचा अहवाल नागरिकांसाठी सार्वजनिक करावा. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळणाऱ्या पाण्याच्या वाहिन्या कोणत्या भागांत कार्यरत आहेत, याचीही माहिती जाहीर करावी. आगामी उन्हाळ्यातील पाण्याची मागणी, उपलब्ध साठा आणि संभाव्य तूट याबाबत महापालिकेने उन्हाळ्यापूर्वी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. नवीन पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी देताना संबंधित भागातील पाणी उपलब्धतेचे पूर्वमूल्यमापनही बंधनकारक करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नैसर्गिक जलस्रोतांचे जतन करा
बेलापूर सेक्टर ३१ मधील पारसिक हिल परिसरातील नाल्याच्या तळाचे काँक्रीटीकरण करण्यामागील तांत्रिक व पर्यावरणीय बाबींची चौकशी करावी. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी. नव्या बांधकामांमध्ये पाणी बचत करणारे एरेटरयुक्त नळ बंधनकारक करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी, असेही मंचाने म्हटले आहे.

आजचे नियोजनच उद्याची जलसुरक्षा
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही केवळ कागदावरील घोषणा राहून चालणार नाही. महापालिकेने शहरात ठिकठिकाणी लहान-मोठे तलाव निर्माण करावेत आणि उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा. भविष्यात पाण्याच्या बाबतीत अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे, असे सजग नागरिक मंचचे कायदेशीर सल्लागार संदीप ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT