मुंबई

रखडलेले क्रीडा संकुल तातडीने सुरू करण्याची मागणी

CD

रखडलेले क्रीडा संकुल तातडीने सुरू करण्याची मागणी
काम सुरू न केल्यास माजी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा इशारा
वाशी, ता. १२ (बातमीदार) ः रबाळे येथील आंबेडकरनगर परिसरातील पीएमश्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयासमोरील मैदानावर उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाचे काम रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पुन्हा सुरू करावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. तसेच वेळ पडल्यास न्यायालयातही धाव घेण्यात येईल, असा इशारा माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे यांनी दिला आहे.
रबाळे येथील पीएमश्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाची विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून, विविध स्पर्धांमध्ये शाळेने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ठाणे ओपन मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. कबड्डीमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, खेलो इंडिया स्पर्धेसाठी दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची निवड होत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. या विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना रेल्वे, पोलिस आणि केंद्र सरकारी सेवांमध्ये संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, या उद्देशाने त्याचप्रमाणे हा भूखंड कोणाच्या घशात जाऊ नये म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेश नार्वेकर यांच्या कार्यकाळात ३ जानेवारी २०२३ रोजी या ठिकाणी इनडोअर स्टेडियम उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती, मात्र फेब्रुवारी २०२६ मध्ये विद्यमान आयुक्तांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर क्रीडा संकुलाचे काम बंद करण्यात आल्याचे सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT