वेद-मंथनची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक
राष्ट्रीय लाठी स्पर्धेत रायगडचा डंका; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : गुजरातमधील वापी येथे झालेल्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत रायगडच्या वेद वैभव कदम आणि मंथन वैभव कदम यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामुळे दोघांचीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १० आणि ११ ऑक्टोबरला झालेल्या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी एकूण ३६ सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.
वेद आणि मंथन यांनी दिल्ली व नागपूरनंतर गुजरातमध्येही पदकांची परंपरा कायम राखली. प्रशिक्षक प्रियांका गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी हे यश मिळविले. त्यांच्या कामगिरीमुळे पालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी मिळविलेल्या ४१ पदकांमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे.
चिमुकल्या गार्गीची सुवर्णभरारी
अलिबाग (वार्ताहर) : अलिबाग तालुक्यातील नागाव येथील पीएनपी सायरस पूनावाला स्कूलमधील सीनियर केजीची विद्यार्थिनी गार्गी गौरव सातनाईक हिने गुजरातमधील वापी येथे १० व ११ ऑक्टोबरला झालेल्या राष्ट्रीय लाठी-काठी स्पर्धेत आठ वर्षांखालील वयोगटात द्वि-अनिका आणि द्वि-लाठी या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावली. यापूर्वी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने द्वि-अनिका प्रकारात सुवर्ण, तर द्वि-लाठी प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. या कामगिरीच्या जोरावर तिला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तिच्या यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, मुख्याध्यापिका गीतिका भूचर, लाठी प्रशिक्षक प्रियांका गुंजाळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.