मुंबई

''म्हाडा''तर्फे पाच कृत्रिम बुद्धिमत्ताधारित सेवा सुरू

CD

‘म्हाडा’तर्फे पाच ‘एआय’ सेवा सुरू
उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : म्हाडाने आपली प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच शासकीय प्रक्रिया सुलभ करणे आणि नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय)आधारित पाच डिजिटल सेवा आज ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सुरू करण्यात आल्या आहेत.
म्हाडाने सुरू केलेल्या एआयअधारित सेवा म्हणजे शासकीय प्रक्रिया पुनर्रचना आणि कार्यपद्धती सुधारणांच्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग असल्याचे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तसेच केवळ कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, प्रशासकीय प्रक्रियांच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे हा आहे. या सेवांमुळे पुनरावृत्तीच्या हाताळणीतील कामात कपात, प्रशासकीय प्रक्रिया आणि माहिती शोधण्याच्या वेळेत बचत, कामकाजातील अचूकता व सुसंगततेत वाढ, संस्थेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा अधिक प्रभावी वापर, नागरिकांना सेवा मिळविणे अधिक सुलभ होणे, नागरिकांच्या विनंत्या संबंधित विभागांकडे जलद पाठविणे, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व कार्यवाहीचा मागोवा घेण्याची सुविधा, भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ताधारित सुशासनासाठी भक्कम पायाभरणी होणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
----
पाच डिजिटल सेवा
- म्हाडातर्फे नागरिक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून, नागरिकांना घरबसल्या म्हाडातील संबंधित अधिकारी, विभागाकडे पत्र, निवेदने, कागदपत्रे पाठवण्यासाठी सीएफसी ॲट होम ही सुविधा काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. या सुविधेत अर्जदारांसाठी एआय आधारित दस्तऐवजाची छाननी सुविधा विकसित करण्यात आली आहे.
- या सुविधेमुळे अर्जदारास योग्य अधिकारी, विभागाची निवड करणे सुलभ होऊन कागदपत्रे योग्य त्या ठिकाणी पाठवण्याची प्रक्रिया अधिक अचूक व जलद होण्यास मदत होणार आहे.
- याशिवाय आर्थिक ताळमेळ प्रणाली, फाइल नामकरण व टॅगिंग प्रणाली, भूखंडविषयक माहितीसाठी आभासी सहाय्यक, ठराव शोध व संलग्नता प्रणाली यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT