स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवरील स्थगिती कायम
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेला धक्का; दोन्ही याचिका फेटाळल्या
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती प्रक्रियेला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी महापौर अश्विनी निकम आणि सभागृह नेते अरुण आशान यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे नियुक्त्यांवरील स्थगिती कायम राहिली आहे.
महापालिकेत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे दोन, अशा सात स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली होती, मात्र भाजपने या नियुक्त्यांवर आक्षेप घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्तीच्या अंतिम अधिसूचनेला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवून सातही सदस्यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्यासाठी महापौर निकम आणि सभागृह नेते आशान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळून उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील चार आठवड्यांत प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिली.
या निर्णयामुळे शिवसेनेची राजकीय कोंडी वाढली असून, सातही स्वीकृत नगरसेवकांचे भवितव्य उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.