एनटीसी कामगारांचे थकीत वेतन रखडले
चार गिरण्यांच्या प्रवेशद्वारांवर साखळी उपोषण; १२ महिन्यांचा पगार, ग्रॅच्युइटीसह अन्य देणी देण्याची मागणी
शिवडी, ता. १४ (बातमीदार) ः एनटीसी गिरणी कामगारांचा गेल्या १२ महिन्यांचा थकीत पगार मिळालाच पाहिजे, ही प्रमुख मागणी समोर ठेवून मुंबईतील चार एनटीसी मिल कामगारांचा गिरण्यांच्या गेटवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. १ महिना ११ दिवस उलटून गेले तरी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या विरुद्ध सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १२) कुलाबा येथील एनटीसी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
घोषणा देत कामगारांनी कुलाबा, बेलार्डपिअर येथील एनटीसी कार्यालय दणाणून सोडले. या आंदोलनात पुरुष कामगारांप्रमाणे महिला कामगारांचाही मोठा सहभाग होता. महाव्यवस्थापक एस. एस. वासन आणि महाव्यवस्थापक अंकीत शर्मा यांची खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, संघटन सेक्रेटरी दीपक राणे, गजानन कदम, बबन आसवले, प्रकाश भोसले आदींनी भेट घेतली असून, उपासमारीने त्रस्त असलेल्या कामगारांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या. दसरा-दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर कामगारांना पगारापोटीची सर्व थकबाकी दिली पाहिजे, हा आग्रह दिल्ली, एनटीसी कार्यालयाकडे कळविण्याचा पदाधिकाऱ्यांवतीने आग्रह करण्यात आला आहे.
जोपर्यंत ठाम निर्णय घेतला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील, असे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या वतीने जाहीर केले. कामगार आपल्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढतील, परंतु काहीही झाले तरी कायदा हातात घेतला जाणार नाही, असेही निवृत्ती देसाई यांनी संघटनेच्या वतीने सांगितले.
एक महिन्यापासून आक्रमक
मुंबईमधील टाटा, इंदू मिल क्रमांक ५, पोद्दार आणि दिग्विजय या गिरण्यांच्या ठिकाणी एक महिन्यापेक्षा अधिक काळ आंदोलन सुरू आहे. एनटीसी कामगारांना ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ पर्यंत पगार देणे बाकी आहे. २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅच्युइटी मिळालेली नाही. कामगारांचे घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता इत्यादी कायदेशीर देणी मिळायची आहेत. बाहेरील कामगारांना जून २०२२ पर्यंत पूर्ण पगार व जुलै २०२३ नंतर फक्त पन्नास टक्के पगार देण्यात आला आहे, अशा मागण्या कामगारांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.