सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मुंबईतील मघवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील सहआरोपीलाही डोंबिवलीतून अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेतील टिळक रोडवरील शांतकुंज बंगला येथे ‘प्रोगेन रेंटल मार्केटिंग सर्व्हिसेस’ आणि ‘स्क्रिप्टन सॉफ्टवेअर’ या कंपन्यांची कार्यालये सुरू केली होती. या कंपन्यांच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे प्रलोभन नागरिकांना दाखवण्यात आले, मात्र गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर डोंबिवली पोलिस ठाण्यात ६ सप्टेंबरला गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत जगदीश आंगणे (वय ५४) याने यापूर्वी ‘कोकण स्मार्ट’ समूहाच्या नावाने शेअर ट्रेडिंग, मार्केटिंग, गुंतवणूक सल्ला, विमा आणि मालमत्ता विकासाशी संबंधित कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा दावा आहे. याप्रकरणी भांडुप आणि डोंबिवली पोलिस ठाण्यांतही गुन्हे दाखल आहेत. सध्याच्या गुन्ह्यात तो स्वतःची ओळख लपवून तसेच मोबाईल क्रमांक बंद करून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रशांतला मघवाडी येथून, तर जितेंद्र कांतीलाल गाला याला डोंबिवलीतील टिळकनगर परिसरातून अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.