मुंबई

बदलापूरमध्ये १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात

CD

बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : एल निनोच्या पार्श्वभूमीवर उल्हास नदीतील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी बदलापूर शहरात पाणीकपातीचे नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबरपासून पाणी वितरणामध्ये किमान १० टक्के कपात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कुळगाव-बदलापूर जलव्यवस्थापन उपविभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, उपलब्ध जलसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज लक्षात घेऊन बदलापूर पूर्व आणि पश्चिम विभागातील विविध परिसरांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जाणार आहे. पूर्व विभागातील सोमवार ते रविवार अशा सातही दिवसांसाठी स्वतंत्र परिसर निश्चित करण्यात आले असून, खरवई परिसरासाठीही सोमवार ते शुक्रवार असे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पश्चिम विभागातील परिसरांनाही या नियोजनानुसार पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरिकांनी आपल्या परिसरासाठी निश्चित केलेला दिवस लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी एस. एस. खाद्री यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

नवरात्र-दिवाळीत नागरिकांची कसरत!
नवरात्रोत्सव आणि दिवाळी अशा ऐन सणासुदीच्या काळातच पाणीकपात लागू होणार असल्याने बदलापूरकरांच्या आनंदावर पाण्याचे संकट येण्याची शक्यता आहे. घरातील पूजा-अर्चा, फराळाची तयारी, पाहुण्यांची वर्दळ आणि स्वच्छतेची कामे अशा धावपळीच्या काळात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांना पाण्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

SACHIN YUVRAJ: सचिन तेंडुलकर, युवराज सिंग अन् झहीर खानला संघातून का डच्चू दिला? माजी मुख्य निवडकर्त्याने सांगितलं खरं कारण!

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार यांनी शेतकरी व सभासदांशी साधला संवाद; विजयाबद्दल मानले आभार

नकळत जयच्या मनातील प्रेम ओठांवर येणार! शरूसमोर देणार प्रेमाची कबुली? SANAI CHAUGHADE मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Gandhinagar: अमित शाहांच्या मतदारसंघात काय घडलं? गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?

SCROLL FOR NEXT