दिवाळेतील गटाराचा प्रश्न मार्गी
भारती कोळी यांच्या पाठपुराव्याला यश
नेरूळ, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक २७ मधील दिवाळे कोळीवाडा परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गटाराच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. गटारातील दूषित पाण्याचा प्रवाह, दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांनी या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून पाठपुरावा केल्याने गटारावर सुरक्षित झाकण बसविण्यासह आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली.
दिवाळे कोळीवाड्यातील गटाराच्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. दूषित पाण्याच्या प्रवाहामुळे दुर्गंधी पसरत होती, तर डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येकडे नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतर नगरसेविका भारती कोळी यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. या वेळी आवश्यक दुरुस्ती करून गटारावरील सुरक्षित झाकण बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाने कार्यवाही करीत दुरुस्तीची कामे पूर्ण केली. त्यामुळे परिसरातील अस्वच्छता आणि संभाव्य आरोग्यविषयक समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नगरसेविका भारती कोळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी आभार मानले. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर वेळेत उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.