सीवूड्स कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सीवूड्स येथे नवरात्रोत्सव उत्साहात
नेरूळ, ता. १३ (बातमीदार) ः धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट व राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सीवूड्स, सेक्टर-४६ येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ‘सीवूड्सची कुलस्वामिनी’ म्हणून ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाचे सीवूड्सची कुलस्वामिनी मंडळाचे २३वे वर्ष असून, देवीची विधिवत स्थापना करून नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा होणार आहे, मात्र राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकरी बांधवांच्या अडचणींचे भान ठेवून, यंदा दांडियाचा जल्लोष न करता भक्ती परंपरा आणि सामाजिक बांधिलकी ठेवून महिलांकरिता विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस माता की चौकी, जागरण गोंधळ, पाककला स्पर्धा, पारंपरिक भोंडल्याचे खेळ, होम मिनिस्टर तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाचा नवरात्रोत्सव हा भक्तीचा, परंपरेचा आणि सामाजिक बांधिलकीचा असणारा आहे, असे धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी सांगितले.
इको-फ्रेंडली सजावटीचा आकर्षक देखावा
यंदा मंडपात गुहेची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तसेच शिवलिंग आणि नंदी यांची सुंदर मांडणी करण्यात आली असून, हा पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साकारण्यात आला आहे. संपूर्ण मंडपाचे डेकोरेशन कागद आणि पुठ्ठ्यापासून तयार करण्यात आले असून, यामुळे मंडप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण सजावट साई कळंबे यांच्यासह सर्वेश गांडाळ मंडळाचे स्वयंसेवक तेजस पाचपुते, राजेश सतावर, राजेश जाधव, आदित्य ठक्कर यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.