मुंबई

टी-१ टर्मिनलच्या पुनर्विकासासाठी संयुक्त कार्यगट; दोन आठवड्यांत आराखडा तयार होणार

CD

मुंबई विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात बदल नाही
टी-१ टर्मिनलच्या पुनर्विकासासाठी दोन आठवड्यांत आराखडा

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-१ टर्मिनलच्या पुनर्विकासाबाबत अदाणी समूहाचे जीत अदाणी आणि अरुण बन्सल यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी हिवाळी वेळापत्रकात विमानांच्या उड्डाणांच्या वेळांमध्ये बदल केला जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. तसेच, विमानतळावरील कामकाजावर पुनर्विकासाचा परिणाम कमीत कमी ठेवण्याचे ठरले.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या (मियाल) निवेदनानुसार, टी-१ टर्मिनलच्या पुनर्विकासासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. हा गट दोन आठवड्यांत कामाचा आराखडा तयार करणार आहे. या कामासाठी विमान कंपन्यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरास सहकार्य
मुंबईतील हवाई वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी आगामी उन्हाळी वेळापत्रकापासून विमानांचे उड्डाण आणि वाहतूक अधिक संतुलित करण्यावर चर्चा झाली. ज्या विमान कंपन्यांना आपले कामकाज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवायचे आहे, त्यांना मियालकडून सहकार्य केले जाणार आहे. या विषयांवर चर्चा करण्यासाठी २८ ऑक्टोबरला पुन्हा बैठक होणार आहे. तोपर्यंत मियाल आणि विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उड्डाणांच्या वेळा आणि नियोजनाबाबत चर्चा सुरू ठेवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT