भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : मुंबई-नाशिक महामार्गावरील येवई नाका येथे चोरट्यांनी मारहाण करीत अपहरण करून कंटेनरमधील मुद्देमाल पळवल्याची तक्रार देणारा चालकच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक उकल भिवंडी तालुका पोलिसांनी केली आहे. पोलिस पथकाने योगेशकुमार जैयस्वार, मनीष पाल, शिवकुमार धुरिया या तिघा साथीदारांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील मोनू पाल आणि सुनील यादव या फरार संशयितांचा शोध पोलिस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम येथून पतंजली ट्रान्स्पोर्टच्या कंटेनरमधून औषध कंपनीचा साडेआठ कोटींचा माल घेऊन भिवंडीतील पूर्णा येथील गोदामात घेऊन चालक निघाला होता. २ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी हा कंटेनर येवई नाका येथे आला असता चोरट्यांनी मारहाण करीत कंटेनरसह अपहरण करून माल चोरी केल्याची तक्रार कंटेनरचालक सोमनाथ पाल यांनी भिवंडी तालुका पोलिसांकडे केली होती. विशेष म्हणजे आपले अपहरण झाल्याचे चालकाने कंपनी मालकास फोन करून कळवले होते. त्यावर विश्वास ठेवून पतंजली ट्रान्सपोर्ट कंपनी मालकाने त्यास तक्रार देण्यास सांगितले होते.
या गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलिस पथकाने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून कसून चौकशी केली असता, चालक सोमनाथ पाल आणि वाहक रामसिंग यादव यांच्यावर संशय बळावला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन, पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्यांनी अन्य पाच साथीदारांच्या मदतीने हा दरोड्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले.
बोईसरमध्ये चोरीचा माल
चोरी केलेला कंटेनर हा पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे लपवून ठेवून चोरी केलेला सर्व मुद्देमाल एका गोदामात ठेवल्याचे तपासात आढळले. साडेआठ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करून पाच जणांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.