मुंबई

मोरबे धरणातील गाळाचे शास्त्रीय सर्वेक्षण करा!

CD

मोरबे धरणातील गाळाचे शास्त्रीय सर्वेक्षण करा!
नॅटकनेक्ट फाउंडेशनची महापालिकेकडे मागणी; २५ वर्षांत गाळ काढला नसल्याची माहिती
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबईच्या जलसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मोरबे धरणातील साचलेल्या गाळाचे शास्त्रीय सर्वेक्षण करून तो काढण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याची मागणी ‘नॅटकनेक्ट फाउंडेशन’ने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. धरणाची सध्याची साठवण क्षमता, गाळाचे प्रमाण आणि गाळ काढल्यानंतर उपलब्ध होऊ शकणारा अतिरिक्त पाणीसाठा याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी हे सर्वेक्षण आवश्यक असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन दिले आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या महापालिकेच्या उत्तरानुसार, मोरबे धरण महापालिकेच्या ताब्यात आल्यापासून गेल्या सुमारे २५ वर्षांत त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातील गाळाचे प्रमाण आणि त्याचा पाणीसाठ्यावर होणारा परिणाम यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. केंद्र सरकारच्या गाळ व्यवस्थापनविषयक राष्ट्रीय मार्गदर्शक चौकटीतही जलाशयातील गाळामुळे साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता मान्य करण्यात आली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना गाळ काढण्याच्या कामात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उघड्या पडणाऱ्या भागांतील गाळ काढणे शक्य आहे का, याचा महापालिकेने अभ्यास करावा, अशी सूचना कुमार यांनी केली.

जलसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मोरबे धरणातील पाणीसाठा, पाणीपुरवठ्यातील व्यत्यय आणि विकासकांकडून कथित अनधिकृत पाणीउपसा या मुद्द्यांवर आमदार मंदा म्हात्रे यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर शहराच्या जलसुरक्षेचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये मोरबे धरणाची निर्धारित साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर असताना प्रत्यक्ष पाणीसाठा ८२.५५७ दशलक्ष घनमीटर होता. हा साठा एकूण क्षमतेच्या ४३.२४ टक्के होता. त्यातून एका महिन्याचा आपत्कालीन साठा वजा केल्यानंतर वापरण्यायोग्य पाणी ५१.९५७ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच २७.२२ टक्के शिल्लक होते. धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती स्पष्ट होण्यासाठी फाउंडेशनने महापालिकेकडे अद्यायावत आकडेवारी मागितली आहे.

संकट येण्यापूर्वी नियोजनाची गरज
नवी मुंबई नागरिक मंचाचे संयोजक श्रीकांत पाटकी यांनी म्हंटले की, प्रशासक आणि राजकीय नेते संकट निर्माण झाल्यानंतरच जागे होताना दिसतात. जलसुरक्षेसाठी संकटाच्या वेळी धावपळ करण्याऐवजी आधीपासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. ‘हर घर जल संचय अभियान’चे संस्थापक सुभाजित मुखर्जी यांनीही दीर्घकालीन पर्यावरणीय संवर्धनावर भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : राहुल गांधींच्या याचिकेतील तांत्रिक त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात सुनावणी निश्चित

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT