नळाला आठवड्यातून ३६ तासांचा ब्रेक!
उल्हासनगर (वार्ताहर) : आधीच अनियमित पाणीपुरवठ्याने त्रस्त असलेल्या उल्हासनगरकरांच्या अडचणीत आता आणखी भर पडणार आहे. राज्य सरकारच्या १० टक्के पाणीकपातीच्या निर्णयामुळे शहरातील कॅम्प ३, ४ आणि ५ मधील नागरिकांच्या नळाला दर आठवड्याला तब्बल ३६ तासांचा ब्रेक लागणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावपळ वाढणार असून, गृहिणींना पाण्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे ३१ ऑक्टोबर २०२७ पर्यंत नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून २४ तास बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात २२ ऑक्टोबर पासून दर गुरुवारी मध्यरात्री ते शनिवारी दुपारी १२पर्यंत तब्बल ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील हजारो कुटुंबांना पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
----
अंबरनाथकरांवर पुन्हा पाणीकपातीचे संकट
अंबरनाथ (वार्ताहर) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या शहराला पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. १६) सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतरही काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. यापुढे २२ ऑक्टोबरपासून प्रत्येक गुरुवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ३६ तास पाणीकपात केली जाणार आहे. अंबरनाथ पश्चिमेतील काही भागांत दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आधीच अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.