मुंबई

जंजिरा किल्ल्याचे दरवाजे अखेर पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले

CD

मुरूड-जंजिरा किल्ल्याचे दरवाजे खुले!
मुरूड, ता. १४ (बातमीदार) : अरबी समुद्रातील अभेद्य जलदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूड-जंजिरा किल्ल्याचे दरवाजे अखेर पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलेला हा ऐतिहासिक किल्ला पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. किल्ला खुला झाल्याने पर्यटकांसह स्थानिक बोटचालक-मालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पर्यटन व्यवसायाला पुन्हा गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्याच्या काळात किल्ल्याच्या आतील परिसरात तसेच तटबंदीच्या आजूबाजूला पाच ते सहा फूट उंच गवत आणि झाडेझुडपे वाढली होती. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पर्यटकांना सुरक्षित वातावरणात किल्ला पाहता यावा, यासाठी परिसराची स्वच्छता आणि साफसफाई करण्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून सुरू होते.
साफसफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (ता. १४) पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी कल्याण कुमार झा आणि प्रीतेश जाटव यांनी किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले केले. या वेळी त्यांनी किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे स्वागत केले.

१५ वर्षांखालील मुलांना प्रवेश शुल्क माफ
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या १५ वर्षांखालील मुला-मुलींना प्रवेश शुल्कातून सूट देण्यात आली आहे, तर १५ वर्षांवरील प्रत्येक पर्यटकासाठी २५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली.

बोट व्यावसायिकांना मोठा दिलासा

पावसाळ्यात किल्ला बंद असल्याने पर्यटकांची ये-जा थांबली होती. त्यामुळे किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करणाऱ्या स्थानिक बोटचालक-मालकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला होता. आता किल्ला पुन्हा खुला झाल्याने त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित, राजपुरी येथील शिडाच्या होड्यांचे चालक-मालक आणि बोट व्यावसायिकांनी किल्ला पुन्हा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

पर्यटन व्यवसायाला गती
मुरूड-जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी एक आहे. समुद्राच्या मध्यभागी असलेला हा जलदुर्ग पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. किल्ल्याचे दरवाजे पुन्हा खुले झाल्याने आगामी पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या वाढण्याची आणि स्थानिक पर्यटन व्यवसायाला उभारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : मेरठमधील 'ब्लू ड्रम' हत्याकांडात पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT