मुंबई

नवरात्र विसर्जनासाठी भिवंडीत वाहतूक बदल

CD

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : विजयादशमीनिमित्त २० ऑक्टोबरला निघणाऱ्या देवींच्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. शहरात अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्ग बंद करून वाहने पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहेत. यासंदर्भात वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केली आहे.
भिवंडी हे मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबादसह महाराष्ट्रातील विविध भागांना जोडणारे महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. शहरातून जड-अवजड वाहनांची वाहतूक रात्रंदिवस सुरू असते. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतरही भिवंडीतील वाहतुकीचा ताण कायम असल्याने उत्सवातील मिरवणुकांच्या वेळी वाहतूक नियोजनाचे महत्त्व वाढले आहे. विजयादशमीच्या दिवशी २० ऑक्टोबरला भिवंडीत प्रवेश करण्यासाठी असलेल्या कारिवली मार्ग, पारोळ-नदीनाका, धामणगाव-चाविंद्रा, रांजणोली आणि अंजूरफाटा चौक या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या मार्गांवरून येणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. नागरिकांनी वाहतूक विभागाच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिरवणूक मार्गांवर वाहनांना मनाई
रांजणोली नाका ते कल्याण नाका, अंजूरफाटा ते नदीनाका, टावरे कंपाऊंड, दुधबावडी नाका, दर्गा रोड, केशरबाग नाका, मंडई, तीनबत्ती, बाजारपेठ, झेंडा नाका, टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हाफिजीबाबा दर्गा तसेच धामणकर नाका ते वन्हाळदेवी तलाव या विसर्जन मिरवणूक मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. देवींच्या मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त टांगे आणि हातगाड्यांनाही या मार्गांवर प्रवेशबंदी लागू राहणार आहे. मात्र, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि देवी विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : राहुल गांधींच्या याचिकेतील तांत्रिक त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात सुनावणी निश्चित

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT