मुंबई

शहापुरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

CD

शहापूर, ता. १४ (वार्ताहर) : ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने शहापूर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात, नाचणी, वरई, तूर आणि वालाची पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी आणि शहापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी किन्हवली पंचक्रोशीतील ६५ गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १४) आमदार दौलत दरोडा आणि तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले.
शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असून येथील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. खरीप हंगामात भात, नागली, वरई, भाजीपाला, रताळी, तूर आणि वाल यांसारख्या पिकांची लागवड केली जाते. मात्र, यंदा जुलैमध्ये उशिरा सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये मोठा खंड दिला. त्यामुळे किन्हवली परिसरातील पिकांची वाढ खुंटली असून हाताशी आलेली भात, नागली आणि वरईची पिके करपून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये पिकांऐवजी तण शिल्लक राहिल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन पंचायत समितीचे माजी गटनेते सुभाष हरड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक सपाट, हरेश पस्टे, आत्माराम देसले, अनिल हरड, सरपंच जयवंत वाघ, उपसरपंच भगवान धानके आणि शंकर वेखंडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिले. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याची समस्याही गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
शहापूर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसान झालेल्या पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : राहुल गांधींच्या याचिकेतील तांत्रिक त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात सुनावणी निश्चित

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT