मुंबई

ठाणे रिंग मेट्रोवर संवाद

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देण्याची अपेक्षा असलेल्या ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना आता थेट उत्तरे मिळणार आहेत. या प्रकल्पाची आवश्यकता, मार्गाची आखणी आणि शहराच्या वाहतुकीवर होणारे संभाव्य परिणाम यांचा उलगडा करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. गडकरी रंगायतन येथे उद्या (ता. १५) सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार असून, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

ठाणे शहराच्या अंतर्गत वाहतुकीतील कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सुमारे २९ किमीच्या रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाचा शहराला नेमका किती फायदा होणार, मेट्रोचा मार्ग कोणत्या भागांना जोडणार, प्रवासाचा वेळ किती कमी होणार आणि प्रकल्पाचा शहराच्या भविष्यातील विकासावर काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळणार आहेत. रिंग मेट्रोविषयी महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना प्रश्न विचारू इच्छिणाऱ्या नागरिकांनी कार्यक्रमापूर्वी गडकरी रंगायतन येथे आयोजकांकडे आपले प्रश्न सादर करावेत, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी केले आहे. त्यातील निवडक प्रश्नांचा समावेश निरगुडकर यांच्या प्रश्नावलीत करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT