मुंबई

स्पिडी मल्टिमोड्सच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची महाभेट!

CD

स्पिडी मल्टिमोड्सच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची महाभेट!
कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने नऊ हजारांची वेतनवाढ; ४०० हून अधिक कामगारांना मिळणार लाभ
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : उद्योग जगतातील स्पिडी मल्टिमोड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी विशेष आनंदाची ठरणार आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या पगारात तब्बल नऊ हजार रुपयांची वाढ करण्याचा ऐतिहासिक करार मंगळवारी (ता. १३) अधिकृतपणे पूर्ण झाला. पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू होणाऱ्या या कराराचा थेट फायदा कंपनीतील सुमारे ४०० हून अधिक कामगारांना मिळणार आहे.
वेतनवाढीव्यतिरिक्त वैद्यकीय सुविधा, दिवाळी सण बोनस, उत्सव अग्रीम (फेस्टिव्हल ॲडव्हान्स), मोफत गणवेश यांसह इतर सोयी-सुविधांचाही यात समावेश आहे. या विशेष करारप्रसंगी न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे (एनएमजीकेएस) संस्थापक-अध्यक्ष महेंद्र घरत, सरचिटणीस वैभव पाटील, कामगार प्रतिनिधी तुकाराम कडू तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी प्रवीण पाटील आणि प्रणीत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यापूर्वी स्पिडी मल्टिमोड्स कंपनीत तब्बल आठ वेगवेगळ्या कामगार संघटना सक्रिय होत्या. स्थानिक भूमिपुत्र कर्मचाऱ्यांच्या हक्काशी कोणतीही तडजोड होणार नाही, हा ठाम पवित्रा घेत घरत यांनी कंपनी प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा घडवून आणली. स्वाक्षरी सोहळ्यानंतर बोलताना महेंद्र घरत म्हणाले, की स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी मी नेहमीच तत्पर असेन, ही भूमिका मी कंपनी प्रशासनासमोर स्पष्ट मांडली. त्याचवेळी व्यवस्थापनाच्या अडचणीही समजून घेतल्या. त्यामुळे प्रशासनानेही अत्यंत सकारात्मक कौल दिला. कामगारांच्या पाठीशी उभे राहून ही मोठी वेतनवाढ मंजूर केल्याबद्दल मी स्पिडी व्यवस्थापनाचे आभार मानतो. याप्रसंगी विवेक म्हात्रे, अनंत कडू, जयेंद्र कडू, प्रवीण कडू, धर्मेंद्र कडू, दिनेश तांडेल, गजानन म्हात्रे, दीपक पाटील, अजय ठाकूर, चक्रधर घरत, गणेश घरत, दिलीप तांडेल, पंकज घरत, मनोज तांडेल, निशिकांत घरत यांच्यासह कंपनीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : पुण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT