मुंबई

सेमीकंडक्टर क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला मिळणार बळ;. २५० कोटींच्या निधीतून संशोधनाधारित स्टार्टअप्सना प्रोत्साहन

CD

सेमीकंडक्टर क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला बळ
२५० कोटींच्या निधीतून संशोधनाधारित स्टार्टअप्सना प्रोत्साहन

मुंबई, ता. १४ : भारतीय शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमधून उदयास येणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाधारित उद्योगांना भांडवली पाठबळ देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘वाय-पॉइंट व्हेंचर कॅपिटल फंड’ने आपली पहिली गुंतवणूक आयआयटी मुंबईमधून विकसित झालेल्या ‘रेलसिम सोल्युशन्स’ या स्टार्टअपमध्ये केली आहे. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगासाठी चिप्सच्या विश्वासार्हतेशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या या कंपनीला वाय-पॉइंटकडून निधी मिळणार आहे. ही गुंतवणूक कंपनीच्या मोठ्या निधी उभारणी प्रक्रियेचा एक भाग आहे.
आयआयटी मुंबईच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप (साइन) या संस्थेच्या पाठबळावर कार्यरत असलेला वाय-पॉइंट हा भारतातील संस्थेशी संलग्न असलेला पहिला डीप-टेक व्हेंचर कॅपिटल फंड असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात निधी उभारल्यानंतर वाय-पॉइंटने केलेली ही पहिली गुंतवणूक आहे. प्रा. सौविक महापात्रा यांच्या नेतृत्वाखालील रेलसिम सोल्युशन्सने सेमीकंडक्टर उद्योगासाठी भौतिकशास्त्रावर आधारित बहुस्तरीय विश्वासार्हता सिम्युलेशन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. सेमीकंडक्टर चिप्स अधिक प्रगत तंत्रज्ञानाच्या टप्प्यांकडे जात असताना त्यांची कार्यक्षमता आणि दीर्घकालीन विश्वासार्हता तपासणे अधिक गुंतागुंतीचे होत आहे. या आव्हानावर उपाय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कंपनीचे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.
वाय-पॉइंटचे संचालक शाजी वर्गीस यांनी सांगितले की, चिप डिझाइनच्या टप्प्यावर सर्वोत्तम कार्यक्षमता साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या तांत्रिक उणिवेवर रेलसिम काम करत आहे. संशोधनातील सखोल वैज्ञानिक ज्ञान आणि सेमीकंडक्टर उद्योगाच्या बदलत्या गरजा यांचा मेळ घालणाऱ्या या कंपनीसोबत भागीदारी करताना आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील आणखी काही आशादायी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची तयारी सुरू असून, येत्या काही आठवड्यांत त्याबाबतचे व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
एकूण निधी २५० कोटी रुपये
वाय-पॉइंट व्हेंचर कॅपिटल फंडचा एकूण निधी २५० कोटी रुपये आहे. आयआयटी मुंबईसह देशातील प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमधून विकसित होणाऱ्या संशोधनाधारित तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये हा निधी गुंतवला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, प्रगत साहित्य आणि इतर संशोधनप्रधान क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.
...
मार्ग अधिक सक्षम
आयआयटी मुंबईचे उपसंचालक (शैक्षणिक, संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण) प्रा. मिलिंद अत्रे यांनी सांगितले की, शैक्षणिक संशोधनाचे यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयोगशाळा आणि इन्क्युबेशनच्या पलीकडे जाऊन मदतीची आवश्यकता असते. ट्रायस्ट, साइन आणि वाय-पॉइंट यांच्या माध्यमातून आयआयटी मुंबईने संशोधनापासून बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सक्षम केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT