मुंबई

रुग्णालयाच्या अतिरिक्त निधीला नफेखोरी म्हणता येणार नाही

CD

रुग्णालयाच्या अतिरिक्त निधीला
नफेखोरी म्हणता येणार नाही
उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; ब्रीच कँडी रुग्णालयाला दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : एखाद्या खासगी रुग्णालयाच्या कारभारात वर्षाच्या शेवटी अतिरिक्त उत्पन्न जमा किंवा शिल्लक राहणे याचा अर्थ ते नफ्यासाठी चालवल्याचा पुरावा मानता येणार नाही, अशा अतिरिक्त निधीला नफेखोरीही म्हणता येणार नाही, असे महत्त्वूपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आणि दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाला प्राप्तिकर सवलतीप्रकरणी दिलासा दिला.
रुग्णालयाची अतिरिक्त रक्कम ठरवताना केवळ रुग्णालय चालवण्याच्या मुख्य कार्यातून मिळालेल्या उत्पन्नाचाच विचार करणे आवश्यक असल्याचेही न्या. बर्गिस कुलाबावाला आणि न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने रुग्णालय ट्रस्टच्या दोन याचिका मंजूर करताना स्पष्ट केले. तसेच, प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(२३सी) अंतर्गत मंजुरीसाठीचे अर्ज फेटाळणारे मुख्य प्राप्तिकर आयुक्तांचे २०१० आणि २०१२ मधील आदेशउी न्यायालयाने रद्द केले. ही तरतूद नफ्याच्या उद्देशाशिवाय चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांना लागू होत असल्याचे नमूद करून न्यायालयाने २००२-०३ ते २०२१-२२ या कर-निर्धारण वर्षांसाठी रुग्णालय ट्रस्टला कर-सवलतीची मंजुरी देण्याचे आदेश सक्षम कर प्राधिकरणाला दिले. त्यासाठी आठ आठवड्यांची मुदतही दिली.
उत्पन्नाचा वापर कशा प्रकारे केला गेला, यासंदर्भात रुग्णालयाच्या उत्पन्नाचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. यात उत्तम वैद्यकीय सेवांसाठी मालमत्ता खरेदी करण्याच्या बाबींचाही समावेश असल्याचे खंडपीठाने आदेशात नमूद केले. कर प्राधिकरणांनी रुग्णालयाच्या अतिरिक्त उत्पन्नावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच, गरीब रुग्णांना मिळणारी सवलत व मोफत उपचार, डॉक्टरांच्या समुपदेशनासाठीच्या खोल्या आणि व्यावसायिक शुल्काची वसुलीसारख्या मुद्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर केवळ अतिरिक्त उत्पन्न असणे म्हणजे नफा कमावण्याचा उद्देश असणे नाही, असा रुग्णालय ट्रस्टने केला होता. हा युक्तिवाद न्यायालयाने स्वीकारला. रुग्णालय नफ्यासाठी चालवले जात होते, हे सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. रुग्णालयाच्या घटनात्मक दस्तऐवजांमध्ये नफ्याचे वाटप करण्यास मनाई आहे आणि त्याचे उत्पन्न रुग्णालयाच्या कामकाजासाठी व सुविधांसाठी वापरले जाते. तसेच, बनावट किंवा वळवलेला खर्च किंवा रुग्णालयाच्या उद्दिष्टांशी संबंधित नसलेल्या खासगी कारणांसाठी निधीचा वापर केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT