मुंबई

शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण

CD

शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण
डॉक्टरांनी आरोपींना ओळखले
रमेश म्हात्रेंसह पाच जणांची न्यायालयात ओळख
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणाची सुनावणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी (ता. १३) झालेल्या सुनावणीदरम्यान रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव साळुंखे यांनी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींना ओळखले. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची दररोज सुनावणी सुरू आहे.
डॉ. साळुंखे यांनी न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तसेच डॉ. सृष्टी बाविस्कर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या वेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या अनिता मावशी आणि डॉ. बाविस्कर यांनाही धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे मानसिक त्रास झाल्याने आपण एमके फॅसिलिटेट सर्व्हिसेस या कंत्राटी संस्थेतील नोकरीचा राजीनामा दिल्याचेही डॉ. साळुंखे यांनी न्यायालयात सांगितले.
सुनावणी सुरू असताना सुमारे १० मिनिटे वीजपुरवठाही खंडित झाला. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या वतीने अ‍ॅड. व्ही. ए. भानुशाली, तर अन्य आरोपींच्या वतीने अ‍ॅड. कुलकर्णी यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू राहणार आहे.
-------
सीसीटीव्ही चित्रणाच्या पडताळणीची मागणी
स्वतःच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मोबाईलवर या घटनेचे ध्वनिमुद्रण केले होते. सुमारे २९ मिनिटे ५९ सेकंदांच्या या दृक्-श्राव्य नोंदीत मारहाणीचा प्रसंग आणि साधना करांडे यांनी इतरांना चिथावणी दिल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सालसिंगकर यांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण आणि ध्वनिमुद्रणाची पडताळणी करण्याची मागणी न्यायालयात केली; मात्र बचाव पक्षाने या पुराव्यांसाठी स्वतंत्र पंचनामे असल्याचे सांगत दोन्ही पुरावे स्वतंत्रपणे सादर करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT