मुंबई

मुलींचे अश्लील व्हिडिओ परदेशात पाठवले!

CD

नालासोपारा लैंगिक अत्याचार प्रकरण
मुलींचे अश्लील व्हिडिओ परदेशात पाठवले!
आरोपी आरिफ शेखवर चौथा गुन्हा; नव्या प्रकरणात पोक्सोचे कलम
नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरिफ शेख याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. १४) दाखल झालेल्या या गुन्ह्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसारही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आरिफविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या चार झाली आहे. यापैकी एक गुन्हा धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी, तर तीन गुन्हे लैंगिक अत्याचाराच्या आरोपांशी संबंधित आहेत.

आरोपीने पीडित तरुणींचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते परदेशात पाठवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याबाबत आरोपीने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्हिडिओंची सत्यता आणि त्यासंबंधीचे पुरावे तपासण्यासाठी पोलिसांकडून मोबाईलची न्यायवैद्यक तपासणी केली जात आहे.
आरिफ शेख हा नालासोपारा येथील एका व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या विरोधात १० ऑक्टोबर रोजी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे अश्लील व्हिडिओ आढळले. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे समोर आले.

पोलिसांच्या तपासानुसार, आरिफने डेटिंग ॲपवर स्वतःचे फोटो टाकले होते. या माध्यमातून १७ ते २४ वयोगटातील तरुणींशी ओळख वाढवून त्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवली जात असल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचेही तपासात उघड झाले आहे. एका पीडित तरुणीने फसवणूक आणि तिचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप केल्यानंतर आरिफविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आणखी तक्रारी समोर आल्या. आता बुधवारी (ता. १४) एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात पोक्सो कायद्याचाही समावेश आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांच्या नोंदीत आढळली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
....
आरिफ शेखची सध्या कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी रेकॉर्डवर मिळाली नाही, पण आता एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात जे आरोप होत आहेत, त्या सर्व बाजूंनी आम्ही सखोल तपास करत आहोत. आरोपीने पीडित तरुणीचे काही व्हिडिओ परदेशात पाठवल्याची कबुली दिली आहे. त्याची फॉरेन्सिक तपासणी आम्ही करत आहोत.
- शशिकांत बोराटे, पोलिस उपायुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

CBI Raid : पुण्यात सीबीआयचे छापे! ‘म्युनिशन्स इंडिया’च्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक; सव्वादोन कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT