अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : घरबसल्या ऑनलाइन काम करून पैसे कमावण्याच्या प्रलोभनाला बळी पडलेल्या अंबरनाथमधील २५ वर्षीय तरुणाची पाच लाख ३१ हजार ५५५ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुगल मॅपवरील ठिकाणांना रेटिंग देण्याचे काम देऊन अधिक परताव्याचे प्रलोभन दाखवत सायबर भामट्यांनी तरुणाकडून विविध बँक खात्यांवर पैसे जमा करून घेतले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष पप्पू गुप्ता (वय २५) यांना ७ ऑक्टोबरला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला. संबंधित व्यक्तीने आपण डिजिटल अड्डा मार्केटिंग एजन्सीतून बोलत असल्याचे सांगून घरबसल्या कामाची संधी असल्याचे सांगितले. त्यानंतर गुप्ता यांना टेलिग्रामवरील ‘अनन्या मेहता’ या खात्याशी संपर्क साधण्यास आणि ‘ग्रुप डिजिटल अड्डा ३४’ या गटात सहभागी होण्यास सांगण्यात आले. गटात गुगल मॅपवरील ठिकाणांना रेटिंग देण्याचे काम दिले. सुरुवातीला एक हजार रुपये भरल्यास ५०० रुपये परतावा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती देऊन त्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान गुप्ता यांनी स्वतःच्या विविध बँक खात्यांतून एकूण पाच लाख ३१ हजार ५५५ रुपये संबंधित खात्यांवर पाठवले. एका संशयास्पद संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगून जमा केलेल्या रकमेचा परतावा मिळाल्याचे खोटे चित्रही दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती, टेलिग्राम खातेधारक आणि संबंधित बँक खातेधारकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.