मुंबई

अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई करा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : अनधिकृत बांधकामे, वाहतुकीला अडथळा ठरणारे स्टॉल आणि बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्यांवर ठाणे महापालिकेने केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांनी शहरातील विविध समस्यांचा पाढा वाचला. प्रशासनाच्या कारवाईतील विलंबामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शहरातील विविध प्रभाग समित्यांच्या हद्दीत रस्ते आणि पदपथांवर स्टॉल उभारले जात आहेत. या स्टॉलवर गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने दुर्घटनेचा धोका वाढत आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून नोटिसा बजावल्या जातात; मात्र प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचे केळकर यांनी निदर्शनास आणले. कारवाईअभावी संबंधितांना अभय मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी अनधिकृत बांधकामांची छायाचित्रेही आयुक्तांना सादर केली. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांना लोकप्रतिनिधींकडे धाव घ्यावी लागते. त्यानंतर पत्रव्यवहार आणि नोटिसांची प्रक्रिया होते; मात्र अतिक्रमणे कायम राहतात, अशी टीका केळकर यांनी केली. शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT