मुंबई

बेसुमार पाणी उधळणाऱ्यांवर थेट सर्जिकल स्ट्राईक!

CD

बेसुमार पाणी उधळणाऱ्यांवर थेट सर्जिकल स्ट्राइक!
बुस्टर पंप, गाड्या धुणे अन बांधकामांवर दणका, दोन दिवसांत ६० सर्विस स्टेशनवर धडक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : भविष्यातील दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागलेली असतानाही पाण्याचा बेसुमार आणि बेशिस्त वापर करणाऱ्या नवी मुंबईकरांवर महापालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या आणि थेट जलवाहिनीवर बुस्टर पंप लावून पाणी खेचणाऱ्यांविरोधात १३ ऑक्टोबरपासून महापालिकेने व्यापक आणि तीव्र मोहीम उघडली आहे. कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली आणि तुर्भे या परिसरात प्रशासनाकडून सध्या कारवायांचा बडगा उगारला जात आहे.
वास्तविक, केंद्र सरकारच्या मानकानुसार प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा अपेक्षित असताना, नवी मुंबई पालिका आपल्या नागरिकांना तब्बल २७० लिटर प्रतिव्यक्ती इतका मुबलक पाणीपुरवठा करते. महापालिकेकडून हा पाणीपुरवठा तुटपुंज्या आणि माफक दरात केला जात आहे, मात्र या सुविधांचा गैरफायदा घेत अनेक नागरिक पाण्याचा अनिर्बंध अपव्यय करताना दिसत आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी, झाडांना घालण्यासाठी आणि चक्क बांधकामाच्या कामांसाठी केला जात असल्याच्या गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. या बेशिस्त वर्तनाला चाप लावण्यासाठी प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. याअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्या वाहनांच्या सर्व्हिस स्टेशनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अवघ्या दोन दिवसांत घणसोली, ऐरोली, तुर्भे आणि कोपरखैरणे परिसरातील तब्बल ६० वाहनांच्या सर्व्हिस स्टेशनवर प्रशासनाने धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे. तसेच, बेकायदा बुस्टर पंप लावून दुसऱ्यांचे पाणी पळवणाऱ्यांवरही थेट जप्तीची आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील प्रत्येक विभागात ही धडक मोहीम वेगाने राबवली जात आहे.

रहिवासी सोसायट्यांवर निर्बंध
महापालिकेने केवळ प्रत्यक्ष कारवाईवरच भर न देता रहिवासी सोसायट्यांनाही कडक सूचना जारी केल्या आहेत. आपापल्या परिसरात पाण्याचा होणारा अपव्यय तात्काळ थांबवावा आणि पाणी वापराबाबत कठोर निर्बंध लागू करावेत, असे स्पष्ट आदेश सोसायट्यांना दिले आहेत. भविष्यात ही कारवाई अधिक तीव्र आणि व्यापक केली जाणार असून, पाण्याचा असाच अपव्यय सुरू राहिल्यास थेट नळ कनेक्शन कापण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी वेळेतच सुधारून पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, अन्यथा पालिकेच्या कठोर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

SCROLL FOR NEXT