मुंबई

विशेष मुलांच्या संगोपनाचा वसा

CD

विशेष मुलांच्या संगोपनाचा वसा
आई डे केअर संस्थेच्या माध्यमातून स्वाती मोहिते यांचे १६ वर्षांपासून कार्य; शिक्षणासह स्वावलंबनासाठी प्रयत्न
पेण, ता. १५ (वार्ताहर) : स्वतःच्या विशेष मुलीच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या छोट्याशा प्रयत्नाचे रूपांतर आज अनेक विशेष मुलांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या संस्थेत झाले आहे. आपल्या मुलीच्या संगोपनातून मिळालेली प्रेरणा समाजातील इतर विशेष मुलांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास पेण येथील स्वाती महेंद्र मोहिते यांनी घेतला. आई डे केअर संस्थेच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून त्या विशेष मुलांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याला पती महेंद्र मोहिते यांची भक्कम साथ लाभली असून, अनेक दात्यांच्या सहकार्यामुळे संस्थेचा विस्तार झाला आहे.
स्वाती मोहिते यांची कन्या चैताली ही सेरेब्रल पाल्सीग्रस्त असल्याने तिच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी विशेष मुलांसाठी डे केअर सेंटर सुरू केले. सुरुवातीला एक-दोन विद्यार्थी या केंद्रात येत होते, मात्र हळूहळू पालकांचा विश्वास वाढला आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे भाड्याच्या जागेत स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कायदेशीर पूर्ततेसाठी विश्वस्त मंडळ स्थापन करून २०१० मध्ये आई डे केअर संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली. पेणमधील वकील सविता फडके आणि उषा फडके यांनी प्रत्येकी अडीच गुंठे अशी एकूण पाच गुंठे जागा वसतिगृहासाठी दान केली. रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पीचिका यांनी बांधकामाची जबाबदारी घेतल्याने संस्थेची तीन मजली वसतिगृहाची इमारत उभी राहिली. आज या संस्थेत अनेक विशेष विद्यार्थी विविध अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधत आहेत.

मातृत्वातून समाजसेवेचा प्रवास
विशेष मुलांचे संगोपन ही केवळ जबाबदारी नसून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे कार्य आहे, ही भावना स्वाती मोहिते यांच्या प्रवासातून दिसून येते. स्वतःच्या मुलीच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या उपक्रमातून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. विशेष मुलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि योग्य वातावरण मिळाल्यास त्यांच्या क्षमतांना वाव मिळू शकतो, हा विश्वास त्यांच्या कार्यातून अधोरेखित होतो. चैतालीच्या जन्माने त्यांच्या आयुष्याला मातृत्वाचा नवा अर्थ दिला आणि त्याच मातृत्वाचा वसा त्यांनी अनेक विशेष मुलांच्या संगोपनातून जपला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT